नकळत आपली भेट झाली. अन
डोळ्यांची भावना डोळ्यांना कळाली
तुझ्या अबोल ओठांनी असे काही सांगितले
कि, न बोलताच माझ मन क्षणात तुझे झाले
झाली एकदा आपली पुन्हा भेट,
तुझ्या नजरांनी केला माझ्या हृदयात प्रवेश थेट
मैत्रीचा केलास जेव्हा तू पुढे हात
त्यातच मिळाली मला आयुष्य भराची साथ
मग झाली आपल्या प्रेमाला सुरुवात, अन
भावना उमलल्या एकसाथ
तुझ्या पहिल्या मिठीत मी असा हरवलो
प्रेमाच्या दुनियेत मी पूर्ण पने मलाच विसरलो
भविष्याच्या विचारात आपण रमू लागलो
स्वप्नांच्या छायेत आपण खुलू लागलो
एकत्र राहायचं छोटास स्वप्न होत
पण, नियतीने लिहिलेलं भलतच होत
- R.sawant
0 comments:
Post a Comment