स्मित हास्य







आज मी एक प्रयोग केला सकाळी सकाळी, १ तास चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं, गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावर असत न तस स्मित हास्य! होय अगदी तसच. मी असाच सोफ्यावर बसून try करायचं ठरवलं.
पहिले १० मिनिटे माझ्या डोळ्या समोर फक्त गौतम बुद्ध आणि चेहऱ्यावर स्मित हास्य! नंतर नंतर मनाच्या डोहात विचारांचे तरंग उठायला लागले,स्मित हास्याने jump मारली ती “मला वेड लागले प्रेमाचे ” या TV वरच्या गाण्यावर, मग गाणी संपताना दगडू समोर आला मग आपली life... काय लायकीच जीवन जगतोय आपण? इथून तरंग उठायला सुरुवात झाली ते दुसर्यांची लायकी काढून, एक पावसावर कविता वाचली मग त्या कवितेतल ओजरणार पावसाच पाणी, काल पाणी नाही आल नळाला, आज येईल इथे पोचल, मग ते direct अलुवरच्या पानावर थेंबे थेंबे खेळायला लागल, तिथून मग डपक्यातल्या चिखलात मग मातीत मग परत गोल वळसा घालून पहिल्या पावसाच्या सुगंधावर पोचल, विजांचा कडकडात, बरसणारे नभ, मग आकाश, पाऊस गेल्यावर साफ, नित्तळ झालेलं पांढर आकाश, मग आकाश गेल गेल ते direct भिडलं mount averest पर्वतालाच, एक विचार बर्फाच पर्वत या कडे जातच होत तेवड्यात तुकोबा आठवले “ दुख पाहता पर्वता एवडे : सुख पाहता जवा एवडे” ! सुख ......??


तेवड्यात mobile वरचा alarm वाजला, alarm वर massage होता “स्मित हास्य आहे का अजून टिकून ?”


अरे देवा !! स्मित हास्य हरवलं बुवा !!            
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment