सांगा जमेल का ?


सुरुवात कुठून करू काळात नाही पण आधी ओळख करून देतो, मी अमोल, वय २२ वर्ष, माझी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला हि गोष्ट प्रेम-कथा आहे अस म्हणा किव्वा अनेक प्रेमाची एक कथा अस समजा

जस जस कथा रंगत जाईल त्याचा अंदाज येईलच,
असो, मी मुळचा नाशिक चा, नंतर मुंबई ला family सोबत आलो आणि आत्ता मुंबईकर.















मी खूप विचार करणारा प्राणी आहे, मला न सतत काही न काही, कशाबद्दल तरी विचार करायला आवडत .काही पण असो मग जिथ पर्यंत माझी क्षमता असते तो पर्यंत मी विचार करतो.माज्या life मध्ये माज्या नशिबी मित्र तर आलेच पण माज्या प्रामाणिक स्वभावामुळे मैत्रिणी पण आल्या. मी कधी मित्र किव्वा मैत्रीण असाही कधी भेदभाव मी काही नाही केला.

माझ्या आवडत्या शिक्षिका शाळेतल्या त्या नेहमी बोलायचा "माणसाच्या दोनच जाती स्त्री आणि पुरुष बाकीच्या जाती या कुठून आल्या हे मला माहित नाही पण त्यामुळे आपल काही भल होणार नाही !"
दुसरी-तिसरीला होतो तेव्हा  ते काही काळत नव्हत आत्ता कळतंय.त्या बाई किव्वा शिक्षिका काही विलक्षण होत्या माझ्यासाठी, मी काहीही आदल कि त्यांना जाऊन विचारायचो आणि त्या मराठी, इतिहास,भूगोल,ना.शास्त्र हे विषय शिकवायच्या मला फक्त त्याच आठवतात बाकीचे पण आठवतात पण कोणी मला माज्या शक्नच निरसन केल किव्वा त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत काही विलक्षण होत अस मला नाही जाणवलं, एका वाक्यात सांगायचं तर बाकीच्यांच्या आणि त्यांच्यातला फरक मला असा जाणवला कि मी कसाही असो मला accept करण्याची त्यांची तयारी होती पण बाकीच्या किंबहुना बर्याच शिक्षकांचा अस असत कि मी कसा आहे तुम्ही मला accept करा आणि तस वागा.


प्रत्येक जण निराल रसायन घेऊन जन्मतो, आणि प्रत्येकाला accept करून त्याने अजून चांगल कस वागाव हे सांगण आणि सागताना पण चांगल वागण काय आहे हे सांगण त्याची सक्ती नसावी हे त्यांचे प्रभावी पणे मला जाणवलेले त्याचं रूप.

खूप साधी गोष्ट वाटतेय मला बोलताना कि सगळ्यांना हव तस स्वीकारणं पण आयुष्य जस जस आपला प्रवास अधिक व्यापक करतो अधिक लोक आपल्या आयुष्याला स्पर्श करतात तेव्हा फक्त एवडी छोटीशी गोष्ट निभावण हि कठीण होऊन जात.

साध उदाहरण आहे, माझ्या शालेतलच घ्याना, तेव्हा मला अस वाटायचं काय हि मुल शिव्या देतात सारख्या सारख्या आणि मी कोण मुलीशी बोललो तर लग्गेच चिडवतात आता शिक्षकांनी सांगितलेलं काळात नाही वाटत त्यांना त्यांना कस accept करू. आता या स्वीकारण्यामध्ये पण एक गम्मत आहे हा
एखाद्या पासून आपल्याला उपद्रव झाला कि त्याला स्वीकारण्याचा प्रश्न निर्माण होतो. नाही तर आपल्याला सर्व मान्यच असत.

आता शाळेत ज्या मित्रांनी मला चिडवल त्यांचा व्यापक अर्थाने विचार केला तर त्यांना हे कोणी शिकवलं, त्याचं वागण थोड खोडसाळ असल तरी मी ज्या वयात होतो त्या वयात चे ते पण होते मी जे तेव्हा शिकलो त्याच्या विपरीत ते शिकले आणि ते वय जे शिकल ते सर्वमान्य असत अस असत.
ते आत्ता कळत मला तेव्हा नाही.

मग प्रत्येक गोष्ट जी उपद्रव करते त्याचा विचार भविष्यात करायचा तेव्हा नाही ??
आणि मग करायचं काय?

मला वाटत उत्तर सोपं आहे "प्रत्येकाला accept करून त्याने अजून चांगल कस वागाव हे सांगण"
जमेल का मित्रांनो???

सोप्प वाटतंय कि अवघड ??


आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग आठवा ना .......
आणि मग विचार करून सांगा जमेल का ?

            
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment