Engineering college मध्ये जर शिक्षक नसले तर.....



      शाळेत असताना हा निबंध आला कि मज्जा, must शिक्षकांबद्दल चांगल चांगल पण खर लिहायचो,
जर शिक्षक नसते तर शाळेत जायला मज्जा नसती आली वेगेरे लिहायचो, तेव्हाचा काळही तसाच होता.जास्त नव्हे अगदी ७-८ वर्षापूर्वी बद्दलच बोलतोय. एक शिक्षिका अजूनही मला कधी कधी भेटतात त्या त्याच शाळेत जेव्हा मी तेथे शिकत होतो अर्थात मी
college मध्ये आहे आता. पण त्या जेव्हा भेटतात तेव्हा आपणहून त्यांच्या पाया पडावस वाटत. त्यात मला कसला भलताच अभिमान वाटतो.

      सध्या मी diploma करतोय  computer engineering मध्ये, अस engineering चा अभ्यास करतोय बोलायायला मज्जा वाटतेय पण शिक्षकांच्या आणि विध्यार्थ्यांच्या quality  मध्ये घसरण झालीय अस मला वाटत आणि जाणवतही. शिक्षकांना विध्यार्थ्यांबद्दल काय वाटत ते मी नाही सांगू शकत पण हा, जरएखादा college मधला शिक्षक समोरून तरी गेला तरी तोंडात अचानक शिवीच येते. Attitude शब्दाचा वास्तविक अर्थ मला college मध्ये कळला आणि उमजला.

      








चला, आता मूळ मुद्यावर येऊया “जर शिक्षक नसले तर .....”
१. Engineering मधून fails झालेले किव्वा मधेच सोडून गेलेले माझे मित्र मानसिक रोगी होणार नाहीत.

२.
Engineering   college मध्ये जर शिक्षक नसते तर निदान भारतात तरी Engineering college चा result   १०० टक्के लागला असता कारण बहुतांश मुल घाबरून जाऊन अभ्यास नाही करत आणि त्यांना कोण घाबरवतो?

३. रट्टा मारणे हा प्रकार नष्ट झाला असता कारण विध्यार्थी
exam मध्ये कमी VIVA मध्ये जास्त रट्टा मारतात.(शिक्षक विध्याथ्यांना रट्टा मारण्यास भाग पाडतो, विध्याथ्यांना सगळ्यातल सगळ याव अशी शिक्षकांची धारणा असते)
४. Engineering   college मध्ये होण्यार्या सुमारे ९९ टक्के आत्महत्या १ टक्क्यावर येतील.

५.
College chairman and founder यांना खूप फायदा होईल आणि ते जास्तीत जास्त सुविधा विध्याथ्यांना देऊ शकतील.

६.
college management and students या दोघांमध्ये “आग” लावणारा वर्ग नसल्याने दोघही एकमेकांसाठी पूरक असतील.

७. निदान महाराष्ट्रात तरी दर वर्षी २००
scientist तरी निर्माण होतील कारण students ने स्वताहून केलेल्या experiments ना कोणी नाव ठेवणार नाही त्याच मानसिक खाच्चीकरण कोणी करणार नाही.
८.
assignment ,manuals, files यांची सक्ती नसल्याने जिथे ज्याची जरज भासेल तिथेच त्याचा वापर होईल त्यामुळे पर्यावरणाच नुकसान होण्यापासून वाचेल.

९. रट्टा मारणारे Engineering   college च्या आस पास पण दिसणार नाहीत उलट ज्यांना खरोखर Engineering मध्ये interest आहे असेच students येतील.

१०. हिटलर मानसिकता असलेली माणसे समाजात कमी होतील
जर आज काल  सारखे बहुतेक शिक्षक नसतील तर........!

शेवटी एवढाच कि पुढे असे दिवस नको यायला कि काही वर्षा नंतर Engineering   college मधून Engineer च्या एवजी circus मधले अस्वल निघतील....!!!
आत्ताच सुधारा स्वताला, समाज्याला नाहीतर नंतर आहे circus.....!!                          
                          
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment