तू




नखरेल स्वभाव 

जिद्दी स्वभाव

डोळ्यात तेज 

उराशी प्रेम

लेखणीत जादू 

मेहनतीत अव्वल 

स्वप्नात प्रेम 

प्रेमात माया 

मायेत दुरावा 

अन दुऱ्यावाटही प्रेमच 

लाजणाऱ्या चेहऱ्यात 

लहान मुलांची मस्ती 

आणि वागण्यात मोठ्या माणसांची भक्ती 

कृतीतहि  शोधतेय प्रेम 

तुज्यात किती रे दडलाय प्रेम ?

प्रेम म्हणजे तूच ...... होय तूच 

तुझ्या येण्यात प्रेम 

तुझ्या जाण्यात प्रेम 

तुझ्या बोलण्यात प्रेम 

तुझ्या  हसण्यात प्रेम

तुझ्या शांतेत प्रेम 

तुझ्या रडतही प्रेमच 

सर्वांवर तुजी आपले पणाची माया 

अन सर्वांचीच हवीय तुला प्रेमाची छाया 

तू तुझ्यात कधीच नसतेस 

तू नेहमी आपल्यात असतेस 

तू नसतेस तेव्हा काही नसत 

तेव्हा काळत तुझ्या असण्याच महत्त्व 

तू कित मस्त आहेस अस म्हणण्यापेक्षा

तू किती आपली आहेस , तू किती माझी आहेस 

तू .. तू  नाहीसच , तू म्हणजे माझ प्रेम आहेस 

माझ प्रेम म्हणजे तू आणि तू म्हणजेज माझ प्रेम 

मग सांग मी कोण ???


SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment